उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी  केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून अनेक महत्वकांक्षी  योजना राबविण्यात येत आहेत.  दिनांक 01 जून 2020 ते 31 जुलै 2020 या कालावधीमध्ये राज्यातील सहकारी  दूध सोसायटी, दुध संघ, दुध उत्पादक कंपनीच्या सभासद असलेल्या दुध उत्पादक शेतकरी व पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक केसीसी अंतर्गत अतिरिक्त पतमर्यादा मंजुरी योजनेचा लाभ देण्यासाठी
विशेष मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील 2665 पशुपालकांना लाभ देण्याचा लक्षांक निश्चित करण्यात आलेला आहे.
 उस्मानाबाद जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व शेळीमेंढीपालन करणाऱ्या  शेतकऱ्यांनी  याचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावच्या दत्तक बँकेकडे संपर्क साधून पात्रतेनुसार आपल्या चालू किसान क्रेडीट कार्ड खात्यावर खेळत्या भांडवलासाठी अतिरिक्त पतमर्यादा मंजुरीचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, उस्मानाबाद यांनी केले आहे.

 
Top