उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवथापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या आदेशाने उस्मानाबाद व उमरगा शहरात विविध मनाई आदेश दिलेले असताना दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
उस्मानाबाद नगरपरिषद हद्दीत अत्यावश्यक सेवा- दुकाने, आस्थापना वगळता संचारबंदी अंमलात असून वेळेचे बंधन आहे. या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन सुरेश यशवंत यरकळ (रा. वेदांतनगर, उस्मानाबाद) यांनी आयसीआयसीआय बँके जवळील दुध- ब्रेड विक्रीचे दुकान व्यवसायास चालू ठेउन दुकाना समोर ग्राहकांची गर्दी केली. हाप्रकार आनंदनगर पोलिस ठाण्याच्या पथकास आढळले. रोहित राजेंद्र निंबाळकर यांनी आज साठे चौक, उस्मानाबाद येथील आपले चहाचे हॉटेल व्यवसायास चालू ठेवल्याचे उस्मानाबाद शहर पोलिसांच्पया थकास आढळले. उमेश आप्पाराव कारागीर यांनी पतंगे रोड, उमरगा येथील आपले ‘फेसलूक हेअर सलून’ दुकान व्यवसायास चालू ठेवले असताना स्वत: मास्क वापरला नाही. तसेच पुरेशा सुरक्षित अंतराचे पालन केले नसल्याचे उमरगा पोलिस पथकास आढळले. यावरुन पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
 
Top