उस्मानाबाद/प्रतिनिधी
कोरोनासंबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द १९४ पोलिस कारवायांमध्ये ४० हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. सार्वजनिक स्थळी थुंकल्याप्रकरणी ११७ कारवायांत २३ हजार ४०० रुपयांचा दंड प्राप्त झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याप्रकरणी ५१ कारवायांत १० हजार २०० रुपये दंड प्राप्त झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षित अंतर न राखता दुकानांसमोर गर्दी निर्माण केल्याप्रकरणी २४ कारवायात पाच हजार ७०० रुपयात दंड प्राप्त झाला आहे. कार, दुचाकीवर जादा प्रवासी बसवल्याप्रकरणी लॉकडाउनच्या काळात अधिक प्रवासी बसवल्याप्रकरणी केलेल्या दोन कारवायात एक हजाराचा दंड आकारण्यात आला. असा एकूण ४० हजार ३०० दंड वसूल झाला.