तुळजापूर / प्रतिनिधी-
आस्थापना परवानाधारकांना एसटीची प्रवासीसेवा पुर्ववत सुरुळीत  होईपर्यंत परवाना शुल्क व करमाफी मिळण्याची मागणी बसस्थानक परिसरातील विविध दुकानदारांनी विभागीय नियञंक उस्मानाबाद यांना निवेदन देवुन केली आहे.
विभागीय नियञंक व आगार प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कोरोना लाँकडाऊन पार्श्वभूमीवर तीन महिन्या पासुन बससेवा बंद असल्याने बसस्थानक परिसरात वर्दळ दिसुन येत नाही याचा परिणाम उपाहार गृह,  लाँटरी सेंन्टर, जनरल स्टोअर्स, कोल्ड्रींक्स हाऊस,  बेकारी,  क्लाँक रुम या परवानधारकांचा  व्यवसाय पुर्णपुणे ठप्प झाला आहे.यामुळे यांच्या कुटुबियांना चारितार्थ चालवणे कठीण झाले आहे.वाणिज्य आस्थापना भरलेल्या मालाची ऐक्सपायरी डेट संपत आली आहे आता व्यवासायीकांना परवाना शुल्क कर भरणे अशक्य असल्याने परवाना शुल्क कर रद्द करावा, अशी मागणी बी. आनंदराव,  विश्वास सिरसट,  दत्ता धुमाळ,  कमल जगदाळे,  गिरीष देवळलकर, सुनिल घागरे , उत्कर्षदिप प्रयाग,  संतोष लोखंडे या व्यवसायीकांनी केली आहे.

 
Top