तुळजापूर/ प्रतिनिधी-
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ४ लाख रुपयांचा धनादेश कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ यांच्या सुपूर्त करण्यात आला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण, कार्याध्यक्ष सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, संस्थापक सचिव नरेंद्र बोरगावकर, सचिव उल्हास बोरगावकर,उपाध्यक्ष संभाजीराव पाटील, संचालक बाबुराव चव्हाण, संचालक राम आलुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वितरण व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नळदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणारा ४ लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी मुधोळ यांना देताना संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण,  संचालक डॉक्टर अभयकुमार शहापूरकर, प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, अधीक्षक धनंजय पाटील, प्रा कपिल सोनटक्के यांची उपस्थिती होती. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नळदुर्ग या दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने यापूर्वी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ८ लाख रुपयांची मदत धनादेशाद्वारे केलेली आहे.

 
Top