तुळजापूर/ प्रतिनिधी
 तिर्थक्षेञ तुळजापूर येथे शनिवारी सापडलेलाकोरोना  रुग्णाचा सोमवार दि.29 रोजी उपचार दरम्यान मुत्यु झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. श्रीतुळजाभवानी मंदीर जवळील भागात आढळल्याने प्रशाषणाने या भागाकडे सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे तुळजापूर शहरातील  कोरोनाने  मरण पावलेला  हा पहिला रुग्ण ठरला आहे तालुक्यात आजपर्यत कोरोना मुळे दोन जण दगावले आहेत.
 या कन्टनमेंट  भागास उपविभागीय अधिकारी डाँ रामेश्वर रोडगे यांनी सोमवारी सकाळी भेट देवुन या भागाची पाहणी केली .व येथील सुरक्षा  व्यवस्थेची मुख्याधिकारी अशिष लोकरे यांच्या कडून सविस्तर माहीती भागात घेतली. यावेळी वैभव पाठक अभियंता अभ्यंग गायकवाड चव्हाण सोबत होते. सदरील भागातील रहिवाशांची गैरसोय होवु नये म्हणून भाजीपाला व बुधवारी एकादशी असल्याने उपवासाचे फराळ साहित्य नागेश नाईक यांच्या वतीने वाटप करण्यात आले. सदरील कोरोना बाधीत व्यक्ती हा स्थानिक व वयस्कर असल्याने ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला आहे अशा लोकांवर प्रशासनाने नजर ठेवली असुन क्वारटांईन करुन स्वँब घेतलेल्या लोकांचा रिपोर्टची प्रशासन  वाट पहात आहे. सदरील व्यक्ती हा मध्यवर्ती ठिकाणी अतिशय दाटीवाटी व वर्दळीचा भागात राहत असल्याने कोरोना व्याप्ती वाढू नये म्हणून  सील केलेल्या भागात वाढ केली असुन सर्वाधिक वर्दळीचा आर्य चौक भाग ही सील मध्ये केला आहे.
 
Top