तुळजापूर / प्रतिनिधी-
 महाराष्ट्र शासनाने अनलाँकडाऊन दोनची मुदत 31 जुलै 2020 पर्यत वाढवल्याने महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेचे मंदीर भाविकांनसाठी खुले होण्याची शक्यता धुसर झाली आहे.
अनलाँकडाऊन 1मध्ये कोरोना आटोक्यात न आल्याने उलट कोरोना बाधीत संख्या दिवसेंदिवस वाढु लागल्याने शासनाने  अनलाँकडाऊन एक प्रमाणेच अनलाँकडाऊन दोनचे नियम जैसे थे ठेवले असल्याने देवीभक्त तिर्थक्षेञी येवु शकणार नाहीत. त्यातच शहरातील एकाचा कोरोना ने मुत्यु झाल्याने व  ग्रामीण भागात ही कोरोना बाधीत रुग्ण संख्या वाढत चालल्याने  श्रीतुळजाभवानी मंदीर भाविकांना खुले होण्याची शक्यता धुसर दिसत आहेत. जुलै अखेर पर्यत मंदीर बंद राहणार असल्याने जवळपास चार महिने श्रीतुळजाभवानी मंदीर भाविकांनसाठी बंद राहणार आहे. सलग तीन  महिने भाविक तिर्थक्षेञ तुळजापूरात न आल्याने व्यापाऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले असताना शासनाने आणखी एक महिना अनलाँकडाऊन दोन वाढविण्याचा निर्णय घेतल्याने हा प्रकार व्यापाऱ्यांनसाठी दुष्ष्काळात तेरावा महिना या म्हणी प्रमाणे ठरणार आहे.
अनलाँकडाऊन एक नंतर मंदीर भाविकांनसाठी खुले होईल या आशावर बसलेल्या व्यापारी पुजारी नागरिक यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. या मुळे सलग चार महिने व्यापार नसल्याने व्यापारी वर्गास आता आपले व्यापारी भविष्य अंधकारमय दिसु लागले आहे. यामुळे तिर्थक्षेञ तुळजापूरातील मंदीर व्यवसायांनवर असलेला रोजगार चौय्था महिन्यात ही मिळण्याची शक्यता कमी असल्याने  बेरोजगारीत वाढ होवुन बेरोजगारांचे मोठे हाल होणार आहेत.
तिर्थक्षेञाची अर्थिक घडी विस्कटली!
कोरोना मुळे सलग चार महिने व्यापार बंद राहण्याची शक्यता  असल्याने तिर्थक्षेञ तुळजापूरातील अर्थिक घडी पार बिघडली असुन याचा मोठा परिणामा अनेक महिने शहरातील व्यापारी वर्गास भोगावे लागणार आहे. पावसाळ्यात भाविक दर्शनासाठी कमी येत असल्याने कोरोना संपुष्टात येईल व दसरा शारदीय नवराञोत्सावा पासुनचा व्यापार सुरु होण्याची शक्यता व्यापारी वर्गातुन वर्तवली जात आहे.
 
Top