वाशी  / प्रतिनिधी-
वाशी तालुक्यात दि.०९,१०,१२ जुन २०२० या कालावधी मध्ये प्रभाग निहाय ऑनलाईन प्रशिक्षण कोविड 19 जाणीव  जनजाग्रती अभियान राबविले  जाण्याच्या उद्देशा नुसार तीन प्रभागातील  एकूण १०४ गट समुदाय संसाधन व्यक्तीना तालुका स्तरावरून प्रशिक्षण देण्यात आले. तालुक्यातील  ५१ गावा मध्ये साधारणतः ९०० समूहातील महिलांना प्रशिक्षण देण्याचे नियोजान करण्यात आले.
त्या नुसार कोविड 19 विषाणूला ह्दपार करण्यासाठी तसेच  आपल्या गावाची  कुटुबाची सुरक्षा व बचाव करण्यासठी उमेद अंतर्गत   कार्यरत crp ,ctc ,mec,bank sakhi,flcrp,livelihood crp यांनी गटाच्या बैठका घेऊन गटातील महिलांना कशा पद्धतीने आपले व आपल्या कुटुबांचे संरक्षण कसे केले पाहिजे याचे प्रात्याक्षिके प्रशिक्षणा दरम्यान दाखवण्यात आले.उदा, घरातून बाहेर पडताना तोडला मास्क वापरणे,वारवार हातधुणे,गटाच्या बैठकांमध्ये बसताना शारीरिक अंतर ठेऊन बसने इ. हे प्रशिक्षण शासनाने ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन करून पूर्ण करण्यात आले.
 
Top