उस्मानाबाद / प्रतिनिधी : -
तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील सैन्यामध्ये असलेले मधुकर धनके यांची मुलगी व सध्या राजश्री शाहू ज्युनियर कॉलेज लातूर येथे शिक्षण घेत असलेली कु राखी मधुकर धनके हिने आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना दररोज सात तास अभ्यास करत १२ वी विज्ञान शाखेतून परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले आहेत तिचे मोठी बहीण वैष्णवी देखील करतेय वैद्यकीय प्रवेशाची तयारी तर आई सुनंदा धनके घरकाम करत करत शेती देखील स्वताच बघतात.
राखीचे प्राथमिक शिक्षण तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द या छोट्याशा गमावतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण झालेले आहे तर माध्यमिक शिक्षण गावातलीलाच श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात पूर्ण केले आहे पहिलीपासून ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या राखीला दहावीतही ९१.४० टक्के चांगले मार्क घेतले होते त्याचबरोबर प्राथमिक शाळेपासून ती खेळात देखील सहभागी होऊन थ्रोबॉल,स्क्वॅश या खेळात राज्यस्तरीय राष्ट्रीय पातळीवर अनेकदा जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व देखील केलेले आहे.
१० वी मध्ये चांगले गुण मिळाल्यामुळे मनामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याचा उद्देशाने पुढील ११ चा प्रवेश राजश्री शाहू कॉलेज लातूर कॉलेजमध्ये घेतलेला परंतु वडील देशसेवेसाठी सैन्यामध्ये असल्याने सर्वस्वी घराची व शेताची जबाबदारी आईवरच होती यामुळे ११ वी व १२ वीचे शिक्षण कॉलेजच्या होस्टेलला प्रवेश घेऊन आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून मनोमनी तसूभरही विचलित न होता पहाटेच चारलाच उठून अभ्यासाला बसायची तसेच सायंकाळीही अभ्यास,असा तिचा दररोजचा दिनक्रम परीक्षेच्या काळात तर पुस्तक डोळयांसमोरून हटलेच नाही डोळा लागला तेवढाच वेळ पुस्तकाला आराम एवढे असताना फक्त अभ्यास एके अभ्यास न करता अभ्यासाशिवायही बॅडमिंटन या आवडीच्या खेळासाठी ती एक तास द्यायची हा तिचा आवडीचा खेळ या व्यतिरिक्त वाचनाची आवड असून,छत्रपती शिवाजी महाराज,स्वामी विवेकानंद,लोकमान्य टिळकां विषयीची पुस्तके तिने वाचलेली आहेत राखीच्या यशात तिच्या आईची व वडिलांची प्रेरणारुपी खूप मदत झालेली आहे.
तिच्या या यशाबद्दल उस्मानाबाद पंचायत समितीचे सदस्य गजेंद्र राजेंद्र जाधव तिच्या यशामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या काळात तिला मार्गदर्शन करणारे बालाजी पवार सर,विठ्ठल गुंड सर,तुकाराम वाडकर सर,वडगाव ग्रामपंचायत सदस्य बळीराम कांबळे,गुणवंत चव्हाण सर,वर्षा डोंगरे मॅडम,अंजली निकते यांनी तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी नेहा कदम,स्नेहल कदम,राणी डांगे,वैष्णवी धनके,शितल कदम,वैष्णवी कदम आदी उपस्थित होते.