उस्मानाबाद/ तुळजापूर - प्रतिनिधी
  उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्युला शनिवार दि.18 रोजी मोठा  प्रतिसाद मिळाला. या पुर्वी दि. 4 व 11रोजीच्या ही जनता कर्फ्युला मोठा प्रतिसाद लाभला होता. जनता कर्फ्यु यशस्वीतेसाठी पोलिस , महसुल नगरपरिषद विभागाने परिश्रम घेतले. त्यामुळे अत्यावश्यक सुविधा वगळता एकही वाहन रस्त्यावर न आल्याने जिल्हयातील रस्ते सुनसान पडलेले दिसत आले.
तुळजापूर तालुका ही कडकडीत बंद
तुळजापूर शहरातील एका ६५ वर्षीय व्यक्तीचे गुरुवारी कोरोनाने निधन झाले होते. त्यामुळे आज कडकडीत जनता कर्फ्यु शहरवासियांनी पाळला. शनिवारी शहरासह परिसरातील दुकाने शंभर टक्के बंद होते तर अत्यावश्यक सेवेचे वगळता एकही वाहन रस्त्यावर न आल्याने आज तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील प्रमुख रस्ते सुनसान पडले होते.
 
Top