नळदुर्ग / प्रतिनिधी-
 बँकेकडून पीक कर्ज मंजूर करुन देतो म्हणून कोणी दलाल शेतकऱ्यांकडून पैसे घेत असतील तर अशा शेतकऱ्यांनी कोणा दलालाला एक रुपया ही देवू नये, बँक कोणाकडून ही कर्ज मंजूरीसाठी पैसे घेत नाही त्यामुळे अशा दलालाच्या मोहाला बळी न पडता ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज पाहीजे असेल त्यांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करुन परीपूर्ण अर्ज एस बी आय च्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये किंवा प्रत्यक्ष  बँकेत संपर्क साधावा असे आवाहन येथील एस बी आय बँकेचे शाखाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
बँकेशी निगडीत असलेल्या ग्रामीण भागातील हगलूर, निलेगाव, गुळहळळी भागात कांही दलालांचा सुळसुळाट झाला आहे, ते दलाल शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करुन आणून देतो म्हणून पाच ते सात हजार रुपये शेतकऱ्यांकडून अर्ज करण्यासाठी घेत आसल्याची चर्चा मोठया प्रमाणात सुरु आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर बँकेचे शाखाधिकारी संतोष पाटील पत्रकारांशी बोलताना त्यांनी पीक कर्जासाठी कोणाही शेतकऱ्यांकडून कोणालाही एक रुपया देण्याची गरज नसल्याचे सांगितले. कारण सध्या मोठया प्रमाणात शेतकरी अर्थीक आडचणीत आहे, शेतकऱ्यांन एकदा पेरणी केलेले सोयाबीन बीयाने उगवले नसल्याने पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. अशा परिस्थीतीत शेतकरी सापडला आहे. शेतकऱ्यांची परिस्थीती नाजूक आहे आणि त्यात एस बी आय मी एक एजंट आहे म्हणून हगलूर, निलेगाव व गुळहळळी भागात कांही दलाल शेतकऱ्यांकडून पीक कर्ज मंजुरीसाठी पैसे घेत आसल्याची चर्चा आहे. दरम्यान ज्या गावात ही चर्चा सुरु आहे अशा गावांना भेटी देत आसल्याचे ही श्री पाटील यांनी सांगितले आहे. त्या गावात जावून कोणी ही पीक कर्ज मंजूरीसाठी कोणालाही एक रुपया दयायची गरज नाही असे शेतकऱ्यांनी त्यांनी सांगितले आहे. हगलूर येथे ही त्यांनी जावून सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी फक्त  परिपूर्ण अर्ज आवश्यक आहे आणि ते अर्ज शेतकऱ्यांनी एस बी आय बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधुन किंवा बँकेत संपर्क साधून आपले अर्ज दयावे असे ही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. पीक कर्ज मंजूर करण्यासाठी कोणी ही बँकेचा एजंट नाही त्यामुळे थेट शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा. त्याच बरोबर ज्या शेतकऱ्यांना कोणी कर्ज मंजूरीसाठी पैसे मागत आहेत त्यांची नावे बँकेत दयावी व कोणाला ही पैसे शेतकऱ्यांनी देवू नये असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
सध्या शेतकऱ्यांची परिस्थीती अत्यंत बिकट आहे, अशा परिस्थीती मध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करुन त्यांना अर्थीक दिलासा देणे गरजेचे आहे परंतु कोण्या दलालाने शेतकऱ्यांकडून पीक कर्जासाठी पैसे घेवून त्यांची पीळवणूक करीत असेल तर त्या दलालावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा ही यावेळी संतोष पाटील यांनी दिला आहे. यावेळी पुढे बोलाताना ते म्हणाले की, सध्या पाचशे ते सहाशे कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफीची रक्कम बँकेत जमा झाली आहे त्यामुळे प्राधान्याने या कर्ज माफीच्या शेतकऱ्यांना आठ दिवसात पीक कर्ज देण्यात येणार आहे. तर नवीन कर्ज मागणी केलेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसात कर्ज देण्याचा आमचा प्रयत्न होत आहे. या शिवाय नळदुर्ग शहरातून तसेच बँकेशी निगडीत असलेल्या ग्रामीण भागातील गावातून कर्ज मागणीसाठी येणारे अर्ज पाहता शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळत आसल्याचे ही यावेळी त्यांनी सांगितले आहे. त्या मुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कर्ज मागणीसाठी परिपूर्ण अर्ज करावा असे ही त्यांनी यावेळी आवाहन करुन कोणत्याही शेतकऱ्यांनी पीक कर्ज मंजूरी करण्यासाठी कोणाही दलालाला एक रुपया ही दयायची गरज नाही, बँक कर्ज मंजूरीसाठी एक रुपया ही मागत नाही त्यामुळे अशा दलाला पासून शेतकऱ्यांनी दुर रहावे, व त्यांनी स्वत:हून कर्ज मागणीसाठी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात किंवा बँकेत थेट संपर्क साधून आपला पीक कर्ज मागणीचा अर्ज दयावा असे आवाहन यावेळी एस बी आय बँकेचे शाखाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
 
Top