उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंगळवारी दि. १४ रोजी एकूण ३३ रुग्णाची भर पडली. त्यात उस्मानाबाद जिल्हा कारागृहातील ( तात्पुरते ) 11 कारागृह कैंदी तसेच ६ कर्मचारी  यांचा समावेश आहे. यापूर्वी याच कारागृहातील ६ कारागृह कैंदी कोरोना पॉजिटीव्ह आले होते. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
त्याच बरोबर उस्मानाबाद शहरातील सात,  वाशी तालुक्यातील तीन, तुळजापूर तालुक्यातील तीन आणि जिल्हा बाहेर  उपचार  घेणाऱ्या  तीन    रुग्ण   कोरोना  पॉजिटीव्ह  आले आहे.
दि.१२ रोजी पाठविण्यात आलेल्या स्वॉब पैकी १३ रूग्ण पॉजिटीव्ह
उस्मानाबाद येथून १२ जुलै रोजी लातूर येथे जे स्वाब पाठवण्यात आले होते, त्यापैकी ९८ रिपोर्ट्स पेंडिंग होते, त्याचा रिपोर्ट सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत.त्यात 13 पॉजिटीव्ह., ३ रिजेक्टेड,१६ अनिर्णित.६६  निगेटिव्ह असा रिपोर्ट प्राप्त झाला आहे.
अशा प्रकरे आहेत पॉजिटीव्ह रुग्ण 
उस्मानाबाद तालुका शहर - ७
 80 वर्षीय पुरुष रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
 10 वर्षीय मुलगा, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद
 38 वर्षीय महिला रा. माळी गल्ली, उस्मानाबाद
 14 वर्षीय मुलगी रा. माळी गल्ली, उस्मानाबाद
 53 वर्षीय महिला, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद
 35 वर्षीय पुरुष, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद
 25 वर्षीय पुरुष, रा. माळी गल्ली उस्मानाबाद
वाशी तालुका - ३
 71 वर्षीय पुरुष रा तेरखेडा.
 20 वर्षीय पुरुष रा. पार्डी.
 18 वर्षीय  पुरुष रा. पार्डी.
तुळजापूर तालुका - ३
 29 वर्षीय पुरुष रा सावरगाव.
 45 वर्षीय महिला रा. सावरगाव.
 53 वर्षीय पुरुष रा. तुळजापूर.
दि. 13/07/2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्स उपलब्ध झाल्यामुळे, त्या माध्यमातून तात्पुरते कारागृह उस्मानाबाद येथील 58 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यापैकी 17 जण पॉजिटीव्ह आले आहेत  त्यात सहा  कारागृह कर्मचारी आणि 11 कारागृह बंदी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 33 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.
 
Top