उस्मानाबाद / प्रतिनिधी)-
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शेरखाने यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील गरीब व गरजवंत अशा ५४० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या अन्नधान्य किटचे वाटप आ. कैलास घाडगे- पाटील व जनता सहकारी बँकेचे माजी चेअरमन तथा संचालक विश्वास शिंदे यांच्या हस्ते दि. ३० जून रोजी करण्यात आले.
नितीन शेरखाने यांच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त शहरातील अत्यंत गरीब व गरजू असलेल्या ५४० कुटूंबांना गहू ,तांदूळ, साखर, चहापत्ती व खाद्य तेल आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, माजी नगरसेवक सुरेश बापू शेरखाने, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव धनंजय शिंगाडे, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोरे, भाजपाचे पांडुरंग लाटे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अमोल पेठे, सतीश लोंढे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. गणपत कांबळे, सचिव बबन वाघमारे, राज्य कार्यकारणी सदस्य धोंडीराम वाघमारे, उद्योजक पद्माकर शेरखाने, संपत शेरखाने, अमित कांबळे, सुहास शेरखाने, शहाजी शेरखाने, अनिल शेरखाने, राहुल सूर्यवंशी, रवी रोहिदास, राजू खाडे, विनोद पवार, सोमनाथ घोडके, दत्ता चव्हाण व आश्रुबा मुंडे आदी उपस्थित होते.
 
Top