उमरगा/प्रतिनिधी-
मुरूम येथील मुलीच्या शासकिय वस्तीगृहातील कोरोना केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीसह स्वॅब घेतलेल्या व्यक्तींना घरी सोडण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. काही तासांनी शहरातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. आणि रात्री साडेबारा वाजता फोनाफोना करून रूग्णांना बोलावून घेण्यात आले. या बेफिकीरीला जबाबदार कोण ? याचा शोध घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे. याबाबत आरोग्य यंत्रणेवर नाराजीचा सुर उमटत आहे
उमरगा शहर व परिसर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. येथील कोविड रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात जागा अपुरी पडते आहे. २० जुलै रोजी २६, दि. २१ रोजी ५ तर २२ जुलै रोजी ६ पॉझिटिव्ह रुग्ण आल्याने आरोग्य विभागाची हतबलता झाला आहे. त्यामुळे मुरुमच्या कोविड केअर सेंटरला बहुतांश रुग्ण पाठविण्यात आले होते. त्यात दोन दिवसापूर्वी निगेटिव्ह आलेल्या व्यक्ती क्वारंटाइनसाठी ठेवण्यात आले होते. शिवाय सोमवारी (दि.२०) स्वॅब घेतलेल्या व्यक्तींचाही समावेश होता. मात्र आरोग्य विभागाने मंगळवारी सांयकाळी सेंटरमधील सर्वच १० लोकांना घरी स्वंतत्र, सुरक्षित राहाण्याचा सल्ला देऊन सोडण्यात आले. रात्री साडेअकरा वाजता ४३ लोकांचा अहवाल आला त्यात घरी सोडून दिलेल्या उमरग्यातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली. तिघा सोबत एकाच कुटुंबातील अन्य तिघे होते. दुर्देवाने या कुटुंबातील घरात आजाराने पिडीत असलेल्या एका जेष्ठ महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे अख्ये कुटुंब चिंतेत पडले. दरम्यान आरोग्य विभागाकडून झालेली चूक सुधारण्यासाठी रूग्णांना परत बोलावले. वरिष्ठ अधिकारी व डॉक्टर्स यांच्यात समन्वय असता तर असा धक्कादायक प्रकार घडला नसता, अशी चर्चा सुरू झाली आहे.