तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील आरळी ( बु) येथे दि. 2 जुलै रोजी सायंकाळी 6 : 30 सुमारास शेतीच्या किरकोळ  वादातून झालेल्या हाणामारीत  चुलत्याने दोन पुतण्याच्या डोक्यात पाठीमागून खोऱ्याने हल्ला केल्याने यात  दोघांचा मुत्यु झाला होता. या  प्रकरणी संशियत  चुलत्याचा मुलगा स्वाताहुन हजर झाला तर अन्य दोघे  नवरा बायकोस माञ पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ. दिलीप टिपरसे यांनी दिली.
या प्रकरणी अधिक माहीतीअशीकी तुळजापूर तालुक्यतील  आरळी बु येथील सुरेश यादव वय 55 यांनी पुतणे रमेश विठोबा यादव (वय 47 ) व गणेश गोविंद यादव (वय 29)  यांच्या डोक्यात सुरेश यादव संभाजी यादव यांनी शेती कामत वापरण्यात येणारे अवजार खोऱ्याचा वापर करत डोक्यात पाठीमागून मारल्याने यात यात रमेश यादव व गणेश यादव मयत झाले होते.
 त्यानंतर 21 वर्षिय संभाजी यादव स्वताहुन हजर झाला तर सुरेश यादव व त्याचा पत्नीस पोलिसांनी ताब्यात घेतले. यादव कुंटुंबियात जमिनीचा वादा सहा महिन्या पुर्वी गावातील लोकांनी मिटवला होता सर्व काही सुरुळीत चालु होते, माञ त्यानंतर गुरुवार रोजी सांयकाळी ट्रँक्टर ने बांध कोरण्याच्या कारणावरुन शाब्दीक चकमक वाढुन  त्याची पर्यावसना हाणामारीत झाली यात दोघांचा मुत्यु झाला. मयत झालेल्या रमेश व गणेश यांचे शुक्रवार शवविछेदन झाल्यानंतर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Top