उस्मानाबाद / प्रतिनिधी
 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे  यांनी काेरोना काळात घेतलेले निर्णयाचे  संपुर्ण जगातून कौतुक केले जात आहे. मुंबईत आणि परिसरांत कोरोनाचा  प्रभाव वाढू  नये म्हणुन जागोजागी कोरोना क्वॅारनटाईन सेटंर उभारले जात आहेत. यासाठी उस्मानाबाद जिल्हाचे सुपूञ व जिल्हाचे सह संपर्क प्रमुख  उद्योगपती  शंकरराव बोरकर यांनी   स्वत:हाचा एक लाख फुटाचा मुंबई कल्याण येथील शॅापिंग माॅल हा महाराष्ट्र सरकारला क्वारंटाइन सेटंर साठी उपलब्ध करून दिला आहे. 
दि.11 जुलै 2020 रोजी  ना. अदित्य  ठाकरे व ना. एकनाथ शिंदे यांनी   माॅल   साईटला  व्हिजीट दिली. यावेळी  शंकरराव बोरकर बोलताना म्हणाले की, माझ भाग्य की मला  जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली  आहे.याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.    बोरकर हे बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झाल्यामुळे  बाळासाहेब यांच्या 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण याच तत्वावर आज पर्यंत  बोरकर यांची वाटचाल दिसुन येत आहे आज पर्यंत  त्यानी अनेकाना मदत केली आहे
 
Top