उस्मानाबाद/ प्रतिनिधी
22 मार्च 2020 पासून महाराष्ट्रामध्ये व दिनांक 25 मार्च पासून संपूर्ण देशांमध्ये लाॅकडाऊन लागू करण्यात आला तसेच सदरचा लॉक डाऊन मे 2020 अखेर पूर्णपणे चालू राहिला. सदरच्या काळामध्ये अनेक गोरगरीब, यंत्रमाग कामगार ,बांधकाम कामगार ,छोट्या घरेलू ,मोलकरीन ,महिला कामगार, छोटे व्यवसायिक ,पानटपरी, चहा गाडी, हेअर कटिंग सलून वाले, फिरता व्यवसाय, छोटे भाजीपाला विक्रेते, इलेक्ट्रिक वायरमन, प्लंबर कामगार अशा प्रकारचे अनेक छोटे-मोठे कामगार जवळजवळ अडीच महिने पूर्ण वेळ घरी बसूनच होते, त्यामुळे त्यांच्या हातामध्ये कोणतेही काम नव्हते. शिवाय कोरोनाच्या आजारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कडक लाॅकडाऊन होते .त्यामुळे कोणत्याही प्रकारचे काम चालू नव्हते. त्यामुळे कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण करता आली नाही .अद्यापही कोरोना प्रभावित काही भागात लाॅकडाऊन आहे . त्यामुळे काढलेल्या कर्जाचे हप्ते व व्याज देणे शक्य नाही म्हणून मार्च, एप्रिल ,मे या कालावधीमध्ये व्याज व हप्ता पूर्णपणे माफ करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी सरकारकडे केली आहे .
तेथील गरिबांना उत्पन्ना अभावी जगणेही कठीण झालेले आहे .या सर्व छोट्या कामगारांचे व व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात असल्याने जीवनात कायमस्वरूपी कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच आर्थिक संकटात असतात .त्यामुळे या सर्वच लोकांना बचत गट ,वेगवेगळ्या फायनान्स कंपनी, पतसंस्था, सहकारी व राष्ट्रीयकृत बँका शिवाय स्वतःचे नावे कर्ज घेऊनच यांच्या गरजा पूर्ण करणे आवश्यक असते. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या बचत गटातून कर्ज घेतलेले असते .त्यामुळे हातात रोजगार व छोटा व्यवसाय ,चालू व्यवसाय असेल तर या लोकांना घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करता येते. आज अखेरच्या पाहणीत असे दिसून आले आहे की या छोट्या उद्योजक व कामगारांनी कर्ज वेळेत परतफेड केलेली आहेत. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दिलेल्या आदेशानुसार फायनान्स कंपन्या मागणी करीत करीत नाहीत परंतु त्या कर्जाचे व्याज व काही अंशी हप्त्याची रक्कम भरा असे फोन करून सूचना देत आहेत .सदर काळामध्ये या लोकांच्याकडे कोणतेच काम नव्हते, शिवाय पूर्णवेळ घरी बसून काढले. व्याजाची व हप्त्याच्या रकमेची भरपाई महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात यावी रकमेची भरपाई महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात यावी . व्याज व कर्जासाठी केवळ मुदत उपयोगाची नाही. कारण व्यवसायाची व कामाची परिस्थिती सुधारली तरी सुद्धा मागील काळात व्यवसायात झालेले नुकसान भरून काढणे शक्य होणार नाहीñ. कारण भावी काळात या रोगाशी लढणे व जीवन जगण्यासाठी काम करणे .आपली व संपूर्ण कुटुंबाची तब्येत सांभाळणे हे करून थकबाकी भागविणे शक्य नाही. त्यामुळे व्याजाला व हप्त्याला सवलत न देता तीन महिन्याचे संपूर्ण हप्ते व्याजासह माफ करण्याचो विनंतीहो ॲड भोसले यांनी केली आहे.