उस्मानाबाद/ प्रतिनिधी
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाला नवी दिल्ली येथील जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने विज्ञान क्षेत्रात मानाचा असणारा स्टार कॉलेजचा दर्जा देण्यात आला आहे.
यासंदर्भात जैवतंत्रज्ञान विभाग व जिल्हाधिकारी सौ. दिपा मुधोळ-मुंडे, उस्मानाबाद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्यावर्षी जुन 2019 मध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या वतीने स्टार कॉलेज साठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावाचे मूल्यांकन होऊन तो सादरीकरणासाठी निवडला गेला होता. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2019 रोजी नवी दिल्ली येथे या उपक्रमाचे महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. संदिप देशमुख यांनी जैवतंत्रज्ञान विभागात सादरीकरण केले होते त्यामध्ये देशातील 32 महाविद्यालयांनी सादरीकरण केले होते त्यात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची निवड झाली आहे.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद मधील स्टार कॉलेज चा दर्जा मिळवणारे एकमेव महाविद्यालय आहे. या स्टार कॉलेज स्कीम च्या माध्यमातून महाविद्यालयातील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र या विभागाच्या विकासासाठी व विविध वैज्ञानिक कार्यक्रमांसाठी पुढील तीन वर्षांसाठी मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प करण्या सहित इतर हि कार्यक्रमांसाठी मोठा उपयोग होणार आहे. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांनी आभिनंदन केले आहे.