उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली. विद्यार्थी संख्या जास्त असतानाही जवळपास 100% निकाल देणारे श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालय हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यालय आहे. यश संपादन केलेले सर्व विद्यार्थी हे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणत्याही विषयाची शिकवणी न लावता फक्त विद्यालयातील अभ्यासाच्या जोरावर स्वतःच्या मेहनतीने हे उज्ज्वल यश संपादन केले आहे.
श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखेतील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश मिळविले आहे. विज्ञान शाखेचा सरासरी निकाल 99.86%, वाणिज्य  शाखेचा सरासरी निकाल 89.86% तर कला शाखेचा सरासरी निकाल 74.32% एवढा लागला आहे.
श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान शाखेतून बारावी परीक्षेसाठी एकूण 715 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 714 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतून कु.यादव प्रतिभा सुनिल ही विद्यार्थ्यीनी 92.76% गुण मिळवून जिल्ह्यात सर्वप्रथम आली आहे. तर कु.घार्गे दिशा संतोष (89.07%), कु.लोमटे प्रतिक्षा पद्माकर (87.69%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. 298 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.
श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून बारावी परीक्षेसाठी एकूण 155 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 139 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून कु.उंबरे पुजा संतोष व राजपुरोहित लोकेंद्रसिंह मोहनसिंह हे दोघेही विद्यार्थ्यी 90.30% गुण मिळवून सर्वप्रथम आले आहेत. तर कु.तिकटे तनुजा श्रीराम (89.23%), हेगडकर श्रीकांत यशवंत  (88.76%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. 46 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.
श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला शाखेतून बारावी परीक्षेसाठी एकूण 222 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 165 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून मोटे ओंकार संब्रत व क्षिरसागर ओमकार राजेंद्र हे दोघेही विद्यार्थ्यी 91.23% गुण मिळवून सर्वप्रथम आले आहेत. तर कु.ढगारे आकांक्षा काशीनाथ   (89.07%), कु.मोरे प्रणोती मनोहर  (88.15%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. 33 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.
मिळालेल्या यशाबद्दल गुरुवर्य मा. के.टी.पाटील सर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. गुणवंत विद्यार्थ्यी व पालकांचा संस्थेचे अध्यक्ष मा.सुधीर अण्णा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सुधीर पाटील म्हणाले की आमच्या विद्यालयातील विद्यार्थी गेल्या दहा वर्षापासून जिल्ह्यात सर्वप्रथम येत आहेत. जिल्ह्यात सर्वप्रथम येणा-या विद्यार्थ्यांना दिली जाणारी धीरुभाई अंबानी शिष्यवृत्ती सलग दहा वर्षापासून आमच्याच विद्यार्थ्यांना मिळत आहे. सर्वांनी राबवलेल्या नियोजनबध्द कामगिरीने हे यश मिळत आहे. अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी मागील पाच वर्षापासून विद्यालयात स्वतंत्र अशी फोटाॅन बॅच कार्यरत आहे. या बॅचला शिकवण्यासाठी दिल्ली, कोटा येथील नामांकित प्राध्यापक वृंद आहे. विद्यार्थ्यांनी इतरत्र न जाता या बॅचचा लाभ घ्यावा.
 यावेळी प्राचार्य साहेबराव देशमुख, उपप्राचार्य संतोष घार्गे, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी, पर्यवेक्षक प्रा.नंदकुमार नन्नवरे, प्रा.तानाजी हाजगुडे, प्रा.अरविंद भगत व सर्व प्राध्यापक, पालक, कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सुर्यकांत कापसे तर आभार प्रा.नन्नवरे यांनी मांडले. मिळालेल्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top