उमरगा / प्रतिनिधी
माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड, उमरगा - लोहारा विधानसभा मतदार संघाचे आ. ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूम शहरातील कंटेंटमेंट झोनमध्ये युवा शिवसैनिक लखन सत्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि.16 जुलै रोजी या भागातील कुटुंबास आर्सेनिक अलबम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. देवा ग्रुपचे अजय बेडजुर्गे यांना युवासेनाच्या वतीने देखील परिसरात अर्सेनिक 30 गोळया देण्यात आल्या. या अगोदरही यांच्या पुढाकाराने भुसणी, नाईकनगर, कोथळी, सुंदरवाडी, बेरडवाडी आदी गावांमध्ये आर्सेनिक अलबम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते. यावेळी युवासेना शहर प्रमुख भगत माळी, नितीश राजपूत, गणेश जोगी, रवी चौधरी, अजय बेडजुर्गे, लखनअप्पा सत्रे, विठ्ठल चौधरी, ओंकार चव्हाण आदिंनी पुढाकार घेऊन वाटप केले.

 
Top