
येथील श्रीतुळजाभवानीमंदीरसंस्थान संचलित श्रीतुळजाभवानी सैनिक विधालयचा फेब्रुवारी २०२० बारावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला .
यात विशेष प्राविण्य १,प्रथम श्रेणी ९व व्दितीय श्रेणीत विधार्थी १७ उर्तीण झाले. विद्यालयात प्रथम अजित हणमंतराव कदम ७७.८० टक्के, व्दितीय - सुजित कोडीबा राठोड ७०.८० टक्के, तृतीय - ब्रदीनाथ मोहन सोमवंशी ६८.९० टक्के प्राप्त केले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डाँ दिपा मुंडे, एसडीओ रामेश्वर शेंडगे, आ. राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसिलदार सौदागर सांळुके, मुख्याध्यापक चंद्रकांत घोडके यांनी अभिनंदन केले.