नळदुर्ग /  प्रतिनिधी- 
कोरोनाच्या संकटात स्वत:चा जीव धोक्यात घालुन नागरीकांच्या सुरक्षेसाठी काम करणारे नळदुर्ग येथील शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे यांना पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्रच्यावतीने “कोरोना महायोद्धा”म्हणुन प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळाल्याबद्दल पत्रकार सुहास येडगे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 कोरोनाच्या संकटात पत्रकारितेच्या माध्यमातुन कोरोनाबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करून कोरोना होऊ नये यासाठी नागरीकांनी काय दक्षता घेतली पाहिजे याबाबत नागरीकांमध्ये जनजागृतीकरण्याचे काम नळदुर्ग येथील पत्रकार सुहास येडगे यांनी केले आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पत्रकारांनी कोरोनाच्या बाबतीत समाजामध्ये जनजागृतीचे काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र या संस्थेने पत्रकार सुहास येडगे यांना “कोरोना महायोद्धा”म्हणुन प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. पत्रकार सुहास येडगे यांना कोरोना महायोद्धा म्हणुन सन्मानित करण्यात आल्याबद्दल . शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे,यांचे शहरातून सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान शहर भाजपाचे अध्यक्ष पद्माकर घोडके, नगरसेवक विनायक अहंकारी,सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, मारुती खारवे, अमर भाळे,पत्रकार उत्तम बनजगोळे, तानाजी जाधव,विलास येडगे, लतीफ शेख,शिवाजी नाईक, दादासाहेब बनसोडे आदीजन  अभिनंदन केले आहे.

 
Top