तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील आरळी बु येथे दि. 2 जुलै रोजी सायंकाळी 6 : 30 सुमारास शेतीच्या जुन्या वादातून चुलत्याने दोन पुतण्याच्या डोक्यात पाठीमागून खोऱ्याने हल्ला करून दोघांची क्रूरपणे हत्या केली आहे.
आरळी बु येथील सुरेश यादव वय 55 यांनी पुतणे रमेश विठोबा यादव वय 47 व गणेश गोविंद यादव वय 29 यांच्या डोक्यात शेती कामत वापरण्यात येणारे अवजार खोऱ्याचा वापर करत डोक्यात पाठीमागून वार करून ठेचून क्रूरपणे हत्या करून आरोपी सुरेश यादव व त्याचा मुलगा संभाजी सुरेश यादव वय 21 हे दोघेही फरार झाले आहेत.
आरळी बु येथे शेतीच्या वादातून हे हत्याकांड घडले आहे,सततच्या शेती वादाचा परिणाम हा दोन व्यक्तीच्या हत्या करण्यापर्यत आला,हत्या ही वादातून घडली असल्याची माहिती समजते,यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे,नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षण राऊत,ईटकळ आऊट पोस्टचे सातपुते यांच्यासह गावचे पोलीस पाटील युवराज पाटील,उपसरपंच व्यंकट पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष किरण व्हरकट ,सुनील पारवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या हत्याकांडामुळे आरळी व परिसर हादरून गेला आहे.

 
Top