उस्मानाबाद /प्रतिनिधी-
तालुक्यातील बेंबळी येथील संशयित कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या तिच्या पाच नातेवाईकांना कोरोना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आरोग्य व पोलिस विभागाने तत्काल संतर्क होऊन ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, 💫संबंधित वृद्ध महिलेला कोरोना आजाराची लागण झाल्याचे अद्याप नाही निश्चित, पूर्वी घेतलेल्या लाळेचा रिपोर्ट अनिर्णित निघाला, त्यामुळे पुन्हा एकदा होणार तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे 💫खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात बेंबळी येथील गणेश नगर येथील रहिवाशी असलेल्या संशयित महिलेच्या संपर्कातील पाच नातेवाईकांना  ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांचे रिपोर्ट आल्यानंतरच पुढील ठोस उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती डाॅ. सूर्यवंशी यांनी दिली.
💫संबंधित वृद्ध महिलेला कोरणाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यास बेंबळी गावाला प्रथमच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख व पोलिस प्रशासनाने सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. व  सोशल डिस्टन्स व अन्य नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top