तुळजापूर/प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी तुळजापुर तालुका पेट्रोल पंप असोसिएशनच्या वतीने शहरातील प्रमुख कार्यालयांना सँनिटायझर फवारणी मशीन गुरुवार दि.2 रोजी वितरीत करण्यात आल्या .तुळजापुर शहर व तालुक्यातील सर्वच पेट्रोल पंप मिळुन नव्याने स्थापन झालेल्या श्री तुळजाभवानी तुळजापुर तालुका पेट्रोल पंप असोसिएशनच्या वतीने शहरातील तहसिल कार्यालय,पोलीस स्टेशन, नगर परिषद, पंचायत समिति, कृषि उत्पन्न बाजार समिती, ग्रामीण रुग्णालय, विज महावितरण या नेहमीच नागारांकाची गर्दी होणाऱ्या ठिकाणी  सँनिटायझर फवारणी मशीन देण्यात आल्या.
   तहसीलमधे तहसीलदार श्री सौदागर तांदळे,  पोलीस स्टेशनमधे पोलीस निरिक्षक श्री हर्षवर्धन गवळी,  नगर परिषदमधे नगराध्यक्ष श्री सचिन भैय्या रोचकरी, मुख्याधिकारी श्री आशिष लोकरे, नगरसेवक श्री विजय आबा कंदले, पंचायत समितीमधे उपसभापती अण्णासाहेब सरडे व बीडीओ प्रशांसिंह मरोड, कृषि उत्पन्न बाजार समितीमधे सभापती श्री विजय गंगणे तसेच ग्रामिण रुग्णालय येथे डॉ. चंचला बोडके, विज महावितरण गोदे साहेब यांनी या मशीन स्वीकारल्या.
या सर्व मशीनी शुभम हायवे पेट्रोलियम, लक्ष्मी पेट्रोलियम, मोरेश्वर पेट्रोलियम, वैष्णवीदेवी पेट्रोलियम, सूर्यकांत पेट्रोलियम, अंजली पेट्रोलियम, धनलक्ष्मी पेट्रोलियम यांच्या वतीने देण्यात आल्या व सहभाग तालुक्यातील सर्वच पेट्रोल पंपांचा आहे.  मशीन वाटप उपक्रमास यशस्वी करण्यासाठी  पेट्रोल पंप असोसिएशनचे गोपाळ देशमुख,सुनिल धुर्वे, विष्णु म्हात्रे, गिरीश हंबारे, ॠषीकेश हंगरगेकर, मोहन गाडे, व आनंद कंदले यांनी परिश्रम घेतले.
 
Top