तुळजापूर / प्रतिनिधी-
 कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने नागरिकांचे घरोघरी थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिमीटरने तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी पालिका २० थर्मामीटर, २० ऑक्सिमीटर खरेदी करणार असल्याचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सांगितले. कोरोनाच्या लढाईत स्थानिक नगरसेवकांचा कार्यकर्त्यांसह सहभाग असणार असल्याचे रोचकरी यांनी स्पष्ट केले.
कोरोनावर उपाययोजनेसंदर्भात नगरपरिषद कार्यालयात आयोजित बैठकीत नगराध्यक्ष रोचकरी बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार सौदागर तांदळे, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. दिलीप टिप्परसे उपस्थित होते. नगराध्यक्ष रोचकरी यांनी लाॅकडाऊन किंवा जनता कर्फ्यूपेक्षा घरोघरी, दुकानात जाऊन नागरिकांची तपासणी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी नगरसेवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असणार आहे. बैठकीला युवक नेते विनोद गंगणे, अमर मगर, पंडित जगदाळे, विजय कंदले, नागेश नाईक, सचिन पाटील, औदुंबर कदम, किशोर साठे, अभिजित कदम, सुनील रोचकरी आदी नगरसेवकांसह पालिका कर्मचारी आदी उपस्थित होते.
 तुळजापूर शहरासाठी शासनाच्या वतीने ५०० अॅन्टिजेन टेस्ट किट मिळणार असल्याचे नगराध्यक्ष रोचकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले. अॅन्टिजेन टेस्ट किटमुळे कोरोनाचे निदान तत्काळ होणार असून यामुळे तातडीने उपाययोजना करण्यात मदत होणार असल्याचे सचिन रोचकरी यांनी स्पष्ट केले.
 
Top