तुळजापूर / प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूरातील व्यापार कोरोना पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेला लाँकडाऊन व जनता कर्फ्यु मुळे ठप्प असल्याने तिर्थक्षेञ तुळजापूचे अर्थचक्र बंद पडले आहे. त्यामुळे हवा पाणी तुळजाभवानी ही म्हण सध्या तंतोतंत लागू पडत आहे. कारण तुळजाभवानीचे मंदीर भाविकांनसाठी खुले केले तरच त्याचा लाभ व्यापारी वर्गास, व्यवसाय होवुन होणार आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर चे अर्थकरण श्रीतुळजाभवानी मंदीरावर 99 टक्के अवलंबून आहे. सध्या श्री तुळजाभवानी मंदीर भक्तांनासाठी खुले केले नसल्याने भक्त तिर्थक्षेञी येत नाहीत. त्याचा परिणाम मंदीराकडे येणाऱ्या मुख्य तीन बाजारपेठांनवर झाला आहे. याठिकाणी भाविक नसल्याने स्मशान कळा पसरली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
अन्यवेळी भाविकांनी भरभरून वाहणाऱ्यां भवानी, महाध्दार,शुक्रवार पेठ या तिन्ही मुख्य बाजारपेठांनमध्ये सध्या कुञे सुध्दा फिरकत नसल्याचे दिसत आहे, माणसे तर फारच दूर अशी परिस्थिती आहे. या रस्त्यावर असणाऱ्या बाजारपेठांन मध्ये रोज ३० ते ४० हजार भाविकांचा वावर असल्याने येथे कोट्यावधी ची उलाढाल होत असे ती आता काही हजार रुपयावर ठेपली आहे. सध्या या तिन्ही रस्त्यावर असणाऱ्या बाजारपेठांनमध्ये ६० ते ७० टक्के दुकानदारांनी दुकाने उघडणेच बंद केले आहे तर २० ते ३० टक्के दुकानदार फक्त उदबत्ती लावून या गिऱ्हाईकांची वाट बघत असल्याचे पहावयास मिळत आहे.