उस्मानाबाद /प्रतिनिधी
शहरातील समर्थ नगर येथे खरेदी जागेचा ताबा घेण्यावरून मूळ मालक व खरेदीदार यांच्यात झालेल्या वादातून मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. हा प्रकार मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास समर्थनगर येथे घडला.याप्रकरणी सीएला अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ खळदकर (रा. समर्थनगर, उस्मानाबाद) यांनी समर्थनगर येथील त्यांच्या मालकीचा प्लॉट व गाळ्याची जागा व्यावसायाने सीए असलेल्या दीपक जोतीराम भातमांगे (रा. तेर) यांना विक्री केला होता. मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दीपक भातमांगे हे त्यांची आई व अन्य २ महिलांसह खरेदी केलेल्या नमूद जागेचा ताबा घेण्याकरीता त्या ठिकाणी राहत असलेल्या भाडेकरुचे सामान बाहेर टाकू लागले. यावर रघुनाथ खळदकर यांचा मुलगा प्रकाश, सुन- प्रज्ञा यांनी भातभांगे यांना सामान फेकून देण्यास अडवणूक केली असता नमूद चौघांनी प्रकाश खळदकर (४८), त्यांच्या पत्नी प्रज्ञा यांना धक्काबुक्की करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी प्रकाश यांना फरशीवर ढकलून दिल्याने यात ते गंभीर जखमी होऊन मयत झाले अशी तक्रार प्रकाश खळदकर यांच्या पत्नी प्रज्ञा खळदकर यांनी दिल्याने वरील चौघांविरोधात खुनासह इतर कलमान्वये आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सीएंना अटक झाली आहे.
 
Top