उमरगा/ प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील श्रीकृष्ण विद्यालयातील माध्यमिक विभागाचे इंग्रजी विषय शिक्षक डी. व्ही. कांबळे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर जून महिना अखेर सेवानिवृत्त झाले त्याबद्दल बुधवार (दि.८) पंचायत समिती सदस्या सौ. क्रांतीताई व्हटकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने त्यांचा घरी जाऊन सत्कार करून भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. श्री कांबळे यांनी ३३ वर्षाच्या सेवेच्या कार्यकाळात शिक्षक व पर्यवेक्षक अशी पदे भूषवली आहेत. त्यांनी इंग्रजी विषयाच्या अनेक प्रशिक्षणात व  चर्चासत्रात सहभाग नोंदवला आहे. या सत्कारावेळी समर्पण सामाजिक संस्थेचे सचिव किशोर व्हटकर, संदीप जमादार, हुसेन पीरजादे, बशीर बिजापुरे, सहशिक्षिका सौ. रेशाबाई कांबळे यांची उपस्थिती होती.

 
Top