तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील मोर्डा धारुर येथील ऐका भावडाने आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन दोनशे झाडांचे जाळीसह वृक्षारोपण करुन ते दहा वर्ष जतन करण्याचा संकल्प करुन आपला वाढदिवस साजरा केला.
आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून वैष्णवी पवार व अभिषेक पवार या बहीण-भावाने हे वृक्षारोपण करीत झाडे दहा फुटाची होइपर्यंत त्यांची जोपासना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह गेली दहा वर्षे वृक्षारोपण करीत आले आहेत. याचेच अनुकरण करीत अभिषेक पवार व वैष्णवी पवार या भावा-बहिणीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत धारूर व मोर्डा या ठिकाणी दोनशे झाडांचे वृक्षारोपण केले. शिवाय ही सर्व झाडे संरक्षक जाळीसह लावण्यात आली असून, झाडे दहा फुटांची होईपर्यंत त्यांना पाणी पुरवून त्यांचे जतन करण्याचा व दरवर्षी वाढदिवसाला 200 झाडे लावण्याचाही संकल्प केला.
यावेळी ह.भ.प. जयहरी महाराज कुलकर्णी, काळूबापू ननावरे, प्रा. रत्नाकर खांडेकर, बालाजी पवार, विशाल पवार, दत्तात्रय पवार, रमेश कामठे, विजय पवार जयसिंग पाटील आदी उपस्थित होते.