उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतेवेळी लागणारे रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र यासारखे कागदपत्रे जमा करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सूट द्यावी अशी मागणी युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतेवेळी  रहिवासी प्रमाणपत्र, तहसीलचे उत्पन्न प्रमाणपत्र यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता असते: मात्र यावर्षी   कोविड- 19   महामारी च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांना हि प्रमाणपत्र काढताना अडचणी निर्माण होणार आहेत. सध्या जिल्ह्यातील शहरी भागात कोविड- 19   ची  परिस्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे या बाबीचा विचार करून यावर्षी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वरील कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी सक्ती करू नये. तुर्तास पालकांच्या स्वयं घोषणा पत्रा वर उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, कुटुंब प्रमाणपत्र इत्यादी ग्राह्य धरण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

 
Top