उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोविड-19 विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वधर्मीय धार्मिक स्थळाच्या ठिकाणी तसेच लग्न समारंभ किंवा इतर सामुदायिक कार्यक्रमाचे ठिकाणी नागरिक एकत्रित जमा होणार नाहीत, याची गांभीयाने दक्षता घेणे आवश्यक आहे.
सध्या श्रावण महिन्यामध्ये सोमवार व इतर दिवशी महादेव मंदिरात व इतर मंदिरामध्ये तसेच बकरी ईद सणानिमित्त मस्जीदीमध्ये नागरिक एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  कोविड 19 चा प्रार्दुभाव वाढण्याची  शक्यता निर्माण होणार आहे.
भूम तालुक्यामध्ये श्रावण महिन्यामधील सोमवारी किंवा इतर दिवशी महादेवाच्या मंदिरात किंवा इतर देवताचे मंदिरात नागरिकांनी एकत्रित येवून पूजा अर्चा करु नये. तसेच बकरी ईद सणानिमित्त मुस्लीम बांधवांनी  मस्जीदमध्ये एकत्रित येवून नमाज पठण करु नये.  नगर परिषदेचे मुख्याधिकारी  यांनी भूम शहरातील व गटविकास अधिकारी  यांनी ग्रामीण भागातील सर्व मंदिरांमध्ये व मस्जीदमध्ये नागरिक एकत्रित येणार नाहीत, यासाठी उपाय योजना करावी. असे असतानाही मंदिर व मस्जीद मध्ये एकत्रित जमाव झालेला दिसून आल्यास संबधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंडसंहिता 1860 नुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, भूम व तहसीलदार, भूम यांनी केले आहेत

 
Top