उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 ठेवीदारांची मुदतठेवी स्वीकारुन ठेवी परत न दिल्यामुळे येथील सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन व संचालक मंडळावर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पतसंस्थेत गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांची ठेवीची मुदत संपल्यानंतर ज्या ठेवीदारांची रक्कम परत दिलेली नाही. त्या ठेवीदारांनी आपल्या ठेवीच्या मूळ व झेरॉक्स कागदपत्रासह आनंदनगर पोलीस स्टेशनच्या आवारातील आर्थिक गुन्हे शाखेत जाऊन आपले ठेवलेले कागदपत्र व म्हणणे सादर करावेत, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक यांनी केले आहे.

 
Top