उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बेंबळी ग्रामस्थांना ग्रा.प. ने विविध करातुन मुक्ती देऊन गाळेधारकांचे ६ महिन्याचे गाळे भाडे माफ करावे तसेच ग्रा.प.कडून होत असलेली सक्तीची वसूली तत्काल थांबवुन दिलासा देण्याची मागणी  अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन खासदार ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आले आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी  बेंबळी गावातील प्रतिबंधित भागातील परिस्थितीचा आढावा शनिवार दि. २५ जुलै रोजी घेतला. यावेळी त्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  कोरोनाच्या या महामारीमुळे व या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणुन केंद्र व राज्य सरकारकडून वारंवार लॉकडाऊन, संचार बंदी, जनता कर्फ्यू आदी कठोर निर्णय घेतले जात आहे. त्यामुळे अनेक व्यवसायांना आर्थिक फटका बसला, त्यामुळे सर्व गोरगरीबांनी उदरनिर्वाह कसा करायाचा असा प्रश्न ही निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रा.प. ने गाळेधारकांचे ६ महिन्याचे भाडे माफ करून गावातील नागरिकांना ग्रा.प.च्या विविध करा मधुन मुक्त करून सुविधा देऊन आधार देण्याची मागणी जोर धरत आहे.
उस्मानाबाद न.प.चा पॅटर्न राबविण्याची मागणी 
उस्मानाबाद न.प.च्या च्या धरतीवर बेंबळी ग्रा.प. ने ही गाळेधारकांचे भाडे माफ करून गावातील नागरिकांना विविध करामधुन मुक्त करावे तसेच बेंबळी ग्रा.प.कडून होत असलेली ही वसुली मोहीम तत्काल थांबविण्याचे आदेश दयावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 
Top