उस्मानाबाद / प्रतिनिधी-
गेली सतरा वर्षे भारतीय जनता पक्ष एसटी आरक्षणाच्या नावाखाली धनगर समाजाला मेंढरांप्रमाणे मागे पळवत आहे. फक्त व्होटबॅक पॉलिटिक्ससाठी वापर करून समाजाला वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढची दिशा ठरवण्यासाठी समाजाला आत्मचिंतन करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून 29 जुलै रोजी ‘आत्मचिंतन दिवस’ पाळण्यात येणार असल्याचे धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी 29 जुलै 2014 रोजी बारामती येथील आंदोलनात येवून सत्ता आल्यास (भाजप- सेनेची) पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणार, असे जाहीर आश्वासन दिले होते. धनगर समाजाने फडणवीसांवर विश्वास ठेवून त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले. पण पाच वर्षाच्य़ा कार्यकाळात त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी कणभरही प्रयत्न केले नाहीत. हा प्रश्न सुटूच नये यासाठी सर्वे मात्र करून घेतले. धनगर समाजाला भुलवण्यासाठी खोटी आंदोलने उभी केली. धनगरांच्या आरक्षणाचे कट्टर विरोधक असलेले मधुकर पिचड यांचा ‘आदर्श राजकारणी’ असा गौरव करत भाजपमध्ये घेतले. धनगर समाज आंदोलनाचे पुरते खच्चीकरण झाले आहे.

 
Top