तुळजापूर /प्रतिनिधी
शहरात  कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर आर्सेनिक गोळ्या वाटप शुभारंभ आमदार  राणाजगजितसिंह  पाटील  यांच्या वतीने आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्यांच्या डब्बींचे वाटप.  श्री विनोद पिटुभैय्या गंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळजापुर शहरातील नगर येथून सुरवात करण्यात आली.रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नागरीकांना आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या शहरात वाटप करण्याचा शुभारंभ  वासुदेव नगर येथून करण्यात आला.
यावेळी युवा नेते  विनोद पिटुभैय्या गंगणे, नगरसेवक  विजय आबा कंदले, रणजीत पाटील, रामराजु जाधव, संतोष भिसे, अशपाक,प्रभाकर देवकर, सुरज गाडे, सुलेमान शेख, ओंकार इगवे व सहकारी उपस्थित होते.
 
Top