तेर/प्रतिनीधी
पुरातन कलाकुसर असलेले तेर येथील सिद्धेश्वर मंदीर कोणत्याही क्षणी कोसळण््याची भिती निर्माण झाली आहे.  वेळीच या मंदीराकडे लक्ष देऊन या मंदिराचा जिर्णोध्दार करण्याची आवश्यकता आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे 12 व्या, 13 व्या शतकातील पुरातन शिवशंकराचे सिद्धेश्वर मंदीर असून मंदीराची रचना गर्भग्रह व पुढे दगडी कलाकुसर असलेला मंडप असून मंडप दगडाच्या चार खांबावर उभारलेला असून या चार खांबावर विविध कलाकुसर असलेले भारवाहक आहेत. .दगडाच्या मंडपावर आडव्या दगडी खांबावर नक्षीयुक्त   विविध शिल्पचिञे काढलेली असून ही चिञर्शंकला कथेतील प्रसंगानुसार रेखाटलेली आहे. मंडप चार दगडी खांबावर उभा असून खांब व छत यामध्ये    विविध प्रकारची कोरीव कलाकुसर असलेली भारवाहकावर मस्तके कोरलेली आहेत.मध्यभागी विविध प्रकारची कलाकुसर  कोरलेली असून गर्भग्रतील शिखराच्या मध्यभागी उत्क्रष्ट कलाकुसर केलेली आहे.दगडी मंडपाचा दक्षिणेकडील भाग पडलेला असून हे,मंदीर कधीही कोसळू शकते इतके ते जिर्ण झालेले आहे.सुजान नागरीकानी पुरातन व उत्क्रष्ट कलाकुसर असलेले तेर येथील सिद्धेश्वर मंदीराकडे लक्ष देऊन पुरातन ठेवा जतन करण्याची आवश्यकता आहे.
 
Top