उस्मानाबाद / प्रतिनिधी
पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्या संकल्पनेतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक गाव-एक पोलिस संकल्पना राबविण्यात येत आहे. त्या नुसार मोहतरवाडी येथे सुखदेव जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मंगळवारी दि.28 जुलै 2020 रोजी मोहतरवाडी ता. उस्मानाबाद येथे भेट देऊन नागरिकांना प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. तोंडाला सतत मास्क वापरावा, सोशल डिस्टंस पाळावा, सँनिटायझरचा सतत वापर करावा अशा सुचना दिल्या. यावेळी पोलीस पाटील सुभाष कदम, सरपंच अच्युत कांबळे, उपसरपंच गणपत चव्हाण, चेअरमन राजाभाऊ चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल पाटील, आशा कार्यकरती मुक्ता भोसले, कालिदास चव्हाण, दिनेश चव्हाण, विशाल चव्हाण, राम सुतार आदी उपस्थित होते.
 
Top