उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि हाताबाहेर परिस्थिती जात असतानाच गुरुवारी (दि.३०) जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मंुडे यांनी दुचाकीवरून फिरणाऱ्यांना चाप लावला आहे. शहरात दुचाकीवरून निष्कारण फिरणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पालिका क्षेत्रात १ ऑगस्टपासून दुचाकी प्रवासाला बंदी घातली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेमध्ये असलेल्या व्यक्तींना दुचाकीवरून प्रवास करण्यासाठी परवानगी असेल.
उस्मानाबाद शहरात आणि जिल्ह्यात कोरेाना झपाट्याने वाढत आहे. दररोज शंभरावर नवे रुग्ण आढळत असल्याने परिस्थिती विदारक बनत आहे. अशा परिस्थितीत कोरेानावर नियंत्रण मिळवितानाच रुग्णांवर तातडीने उपचार करणे, क्वॉरंटाइन सेंटरमधील संशयितांना सुविधा पुरविणे, तपासणीचे प्रमाण वाढविणे, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रशासनाला काम करावे लागत आहे. गंभीर बाब म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात खासगी आणि सरकारी स्तरावर आरोग्य यंत्रण सक्षम नसल्याने उपचारावर मर्यादा येत आहेत. १३ ते १९ जुलैदरम्यान पालिका क्षेत्रात संचारबंदी करण्यात आली होती. मात्र, कोरेानाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. आता विशेषत: उस्मानाबादच्या गल्लोगल्ली कोराेनाचा शिरकाव झाला आहे. आरोग्य प्रशासन, पालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात असताना कोरोना पसरत असल्याने चिंता वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर कोरेानाचा प्रसार होत असताना शहरात फिरणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मंुडे यांनी कोरेानावर नियंत्रण मिळविण्यासाठी गुरूवारी नवे आदेश काढले आहेत. यामध्ये शहरात दुचाकीवरून फिरणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच दुचाकीवरून प्रवास करता येईल. यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी, दूध विक्रेते,वैद्यकीय कामासाठी, आरोग्य क्षेत्र आणि कोरोना नियंत्रणासाठी काम करणाऱ्या पालिकेच्या व्यक्तींचा समावेश आहे. सदरील आदेशाचे उल्लंघण करण्यावर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.याची दि.१ ऑगस्टपासून अंमलबजावणी होणार आहे.
 
Top