उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद शहरात कोरोनाबाधितांच्या संख्या झपाट्याने वाढली असून स्थानिक संसर्गाचा वेग वाढत चालल्याचे दिसत आहे. बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये आणखी 25 जण कोरोनाबाधितांची भर पडली आहे. मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालामध्ये तब्बल 105 जण तर सायंकाळी आणखी 25 जण आढळून आल्याने आजवरच्या कोरोनाबाधितांची संख्या 859 वर पोहचली आहे.
उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र येथील कोविड चाचणी केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या 189 स्वॅबपैकी 82 अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाले आहेत. यात उस्मानाबाद शहरातील तब्बल 23 जण कोरोनाबाधित आढळले असून 5 संदिग्ध तर 107 प्रलंबित आहेत. तर तालुक्यातील रुईभर येथे आणखी 1 तर रत्नापूर येथील 1 कोरोनाबाधित आढळला आहे. उस्मानाबाद शहरातील समता नगर, बार्शीनाका, आणि काकानगर येथे प्रत्येकी 2 तर आकाशवाणी केंद्र, जिल्हा कारागृह, शाहूनगर, सांजा चौक, कुरणेनगर, म्हाडा वसाहत,  हनुमान चौक, शेरखाने पेेट्रोलपंपाजवळ, ख्वाजागर, पोलीस वसाहत, नाईकवाडी नगर, मारवाडी गल्ली, आनंदनगर, महात्मा गांधी नगर, जुनी कन्या शाळेजवळ, तर ओमनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
दिवसभरात महात्मा गांधी नगर येथील सोलापूर येथे उपचार घेत असलेल्या वृद्धाचा तर, ख्वाजानगर येथील व्यक्तीचा मालेगाव येथे तर समता कॉलनी आणि उपळा येथील वृद्ध अशा चौघांच्या मृत्यूची दिवसभरात नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 29 जुलैच्या सायंकाळी एकुण कोरोनाबाधितांची संख्या 859 वर पोहचली असून 482 जणांना उपचाराने बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील 329 जणांवर उचार सुरू असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
Top