कळंब (शहर प्रतिनिधी) :-
 उप विभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दि ७ जुलै रोजी *कोरोना माहामारी संदर्भात  आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आय.एम. ए पदाधिकारी , शहरातील डॉक्टर्स, तालुका वैद्यकीय अधिकारी, न. प चे प्रतिनिधी, उपजिल्हा रुग्णालय आणि गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.
कोरोना चा प्रसार सोलापूर, औरंगाबाद, लातूर आदी शहरात मोठय़ा प्रमाणावर होत असुन तेथुन अथवा इतर मोठ्या शहरातून आलेल्या नागरिकांना ट्रेस करणे, टेस्ट करणे आणि ट्रिट करणे या त्रीसुत्रिचा अवलंब केल्यास कळंब शहरात कोरोना चा शिरकाव रोखण्यासाठी मदत होईल. तसेच नागरिकांनी शासनाच्या दिशा निर्देशांचे पालण केल्यास उदाहरणार्थ खुपच आवश्यकता असेल तरच बाहेर पडणे. तोंडाला मास्क लावणे. सॅनटायजर ने वारंवार हात धुवून घेणे. दोन व्यक्ती मधिल डिस्टेंसिग पाळणे. दुकान, बॅंका, भाजी मंडई, सरकारी कार्यालये, दवाखाने ईई ठिकाणी गर्दी कमी करणे.
यावेळी कोरोना माहामारी रोखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अहिल्या गाठाळ, मंजुष्री लटपटे आणि पोलीस निरीक्षक यांना मान्यवरांच्या हस्ते आय.एम. ए च्या वतिने  कोविड योद्धा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  शासनाच्या बरोबरीने काम करुन कळंब शहर व ग्रामीण परिसर कोरोना मुक्त ठेवण्यासाठी कळंब येथील डॉक्टर्स कटिबद्ध असल्याची ग्वाही देण्यात आली. 
 
Top