उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 केंद्र शासनाने सेवायोजन कार्यालये (सक्तीने पदे अधिसूचित करण्यास भाग पाडणे) कायदा १९५९ व त्याअंतर्गत नियमावली  १९६० (The Employment Exchanges )(Compulsory Notification of Vacancies) Act,1959 And the Rules 1960 made there under) पारीत केले आहे. या कायद्याच्या कलम 5 अन्वये सर्व संबंधित उद्योजकांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती दर तिमाहीस ऑनलाईन भरुन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे.
 कायद्यातील नियम -6 च्या पोटनियम ३ मध्ये निर्धारित करण्यात आल्यानुसार तिमाही विहीतप्रपत्र ईआर-१ च्या प्रयोजनार्थ प्रत्येक वर्षाच्या ३१ मार्च, 3० जून, ३० सप्टेंबर व ३१ डिसेंबर या विहीत तारखा असतील व विहीत प्रपत्र या विहीत तारखेपासून एक महिन्याच्या आत सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे  उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी दिनांक ३० जून, २०२० अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-१ दिनांक ३१ जुलै -२०२० पर्यंत भरण्यात यावे.
 हे तिमाही विवरणपत्र उद्योजकांना, आस्थापनांना ऑनलाईन सादर करता यावे यासाठी  विभागामार्फत www.mahaswayam.in हे वेबपोर्टल विकसीत करण्यात आले आहे. या वेबपोर्टलद्वारे आपण दिनांक ३१ जुलै 2020 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ईआर-१ दिनांक-३१ जुलै २०२० पर्यंत आपला युजर आयडी व पासवर्ड वापरुन ऑनलाईन पध्दतीने भरावे असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top