उस्मानाबाद/ प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधितांनी त्रिशतक ओलांढल आहे. आता एकुण बाधित रूग्णांचा आकडा ३११ च्या पार गेला आहे. या दरम्यान एकुण २०० रूग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहेत. व कोरोनामुळे आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या परिस्थित ९७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, डॉ. सतीश आदटराव यांनी दिली आहे.
 मंगळवारी रात्री एकाच दिवसात सर्वाधिक तब्बल सतरा बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. शिवाय उस्मानाबाद शहरातील धोका वाढला असून चार रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून मंगळवारी ८४ नमुने तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते. सर्व अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी १६ पॉझिटिव्ह, ६१ नेगेटिव्ह, ०३ रिजेक्ट व ०४ अनिर्णित व एक पेशंट लातूर येथे पॉझिटिव्ह आली असल्यामुळे आज  एकूण १७ पॉझिटिव्ह रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा ३११ वर पोहोचला आहे. तर दोनशे जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. १४ जन कोरोनाची शिकार झाले आहेत. ९७ रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत.
 मंगळवारी पॉझिटिव्ह सहा रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील  असून त्यातील दोन झोरे गल्ली (शहरातील)  असून  पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत. एक  रामनगर (उस्मानाबाद) येथील आहे. दोन समता कॉलनी (उस्मानाबाद) येथील व एक कनगरा येथील आहे. अन्य रुग्णामध्ये एक माडज (ता. उमरगा) येथील असून लातूर येथे उपचार घेत आहे. तिचा स्वब लातूर येथे घेण्यात आला आहे.
 दहा रुग्ण भूम तालुक्यातील असून त्यापैकी एक भूम शहरातील पुण्यावरून आलेला आहे. बाकीचे नऊ रुग्ण राळेसांगवी (ता. भूम) येथील असून एकाच कुटुंबातील आहेत. ते सर्वजण पूर्वीच्या पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत.
 
Top