उस्मानाबाद/ प्रतिनिधी-तालुक्यात निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारणाऱ्या अकोला व जालना येथील कंपनीच्या संचालकांच्या विरोधात कृषी विभागाच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बियाणे बाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने बियाणे निरीक्षक तथा कृषी अधीकारी बापु रोहीदास राउत व ज्ञानेश्वर रामराव जाधव यांनी शेतकऱ्यांचे शेतात जाउन पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांना बियाणाची उगवण कमी प्रमाणात झाल्याचे दिसुन आले. यावरुन अकोला येथील बसंत कंपनीचे संचालक गजानन किसनराव काळे व कृषीधन सिडस प्रा.लि. जालना कंपनीचे संचालक व्यवस्थापक दगडू नानाभाऊ अंभोरे यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्यांना दर्जाहीन सोयाबीन बियाणे पुरवठा केल्याने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top