प्रतिनिधी- उस्मानाबाद / तुळजापूर - 
 कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यु तील दुसऱ्या  शनिवार दि 11रोजी  ही  उस्मानाबाद जिल्हयात मोठा  प्रतिसाद लाभला. सर्व ब्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने व रस्त्यावर नागरिक न दिसल्याने रस्ते सुनसान दिसून येत होते.
तुळजापूर शहरात गुरुवारी ऐका हाँटेल चालक कोरोना बाधीत आढळल्याने शहर चिंताग्रस्त बनला होते या पार्श्वभूमीवर शनिवार दि11रोजी प्रशाषणाने पुकारलेल्या जनता कर्फ्यु ला शहरवासियांन सह व्यापारी वर्गाने यात सहभाग होवुन कोरोना संसर्गजन्य साखळी रोखाण्याचा मोहीमेत सहभाग नोंदवला
शहरासह परिसरातील दुकाने शंभर टक्के बंद होते तर अत्यावश्यक सेवेचे वगळता ऐकही वाहन रस्त्यावर न आल्याने आज  शहरातील प्रमुख रस्ते सुनसान पडले होते. शहरात श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचे सुरक्षारक्षक जागोजाग तैनात केले होते. तुळजापूर  शहरात व तालुक्यात मागील बारा  दिवसापासून कोरोना बाधीत रुग्ण मोठ्या संखेने आढळू लागल्यामुळे सर्वञ भितीचे वातावरण निर्माण झाले असुन या पार्श्वभूमीवर जनतेने कोरोना रक्षकभूमिका बजावत जनता कर्फ्यु स्वंयस्फुर्तीने  यशस्वी केला.
 
Top