उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 जिल्ह्यामध्ये कोरोना कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी  उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये लागू करण्यात आलेला आहे.
 उस्मानाबाद  जिल्ह्यात कोरोना कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत आहे. जिल्ह्यात श्रावण महिन्यात विविध ठिकाणी देवस्थानच्या वतीने यात्रा, जत्रा, धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, इतर सभासंमेलने यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. याबाबत दि.29 जून 2020 रोजी आदेश काढून मनाई करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने श्रावण महिन्यात देवस्थानच्या ठिकाणी भाविकांची व लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते परिणामी कोरोना कोविड-19 या रोगाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात श्रावण महिन्यात होणाऱ्या यात्रा, जत्रा, धार्मिक कार्यक्रम यांना स्थगिती देण्याबाबत देवस्थानचे विश्वस्त व आयोजक यांच्या त्वरित बैठका घेवून सूचना देण्यात याव्यात.
 तसेच या व्यतिरिक्त लग्न समारंभ व अंत्यविधीमध्ये 50 पेक्षा अधिक व्यक्ती निदर्शनास आल्यास विश्वस्त व आयोजकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.
 
Top