तुळजापूर / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयातील कृषी विक्रेता केंद्राने पुकारलेल्या बेकायदेशीर बंद बाबतीत त्यांच्यावर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभीमानीशेतकरीसंघटनेने निवेदन देवुन केली आहे.
स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली धनाजी पेंदे, दुर्वास भोजणे, संजय भोसले, नेताजी जमदाडे , प्रदिप जगदाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचीका दाखल झाल्याने बोगस बियाणे उत्पादन करणाऱ्या बि-बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणून गेले आहेत उस्मानाबाद जिल्हयात बोगस बियाणे न उगवल्याने कळंब तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे .
वास्तविक पाहता राज्यात न्यायालयाचा आदेशाने महाराष्ट्र शासनाचा गुणनियञंक विभागाने संबंधितांनवर 420 चे गुन्हे न्यायालयाच्या आदेशाने दाखल झाले आहेत. त्यामुळे सदर निर्णय मुळे बंद पुकारणे न्यायालय आदेशाचे उल्लंघन करणे आहे म्हणून बंद मध्ये सहभागी होणाऱ्या दुकानदारावर तात्काळ कारवाई करुन गुन्हे दाखल करावे, अन्यथा स्वाभीमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असे निवेदनात म्हटलं आहे.