उस्मानाबाद /प्रतिनिधी-
निवासी जिल्हाधिकारी श्री राजेंद्र खंदारे यांची खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष नंदू भैय्या राजेनिंबाळकर, जिल्हा कृषि अधिक्षक श्री.घाडगे, तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी यांनी भेट देऊन निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांचा खरीप पिक विमा भरणे सुरु असून जिल्हयातील अनेक गावे, ७/१२ , ८ अ, हे एन.आय.सी. च्या पोर्टलवर दिसत नसल्याने अनेक शेतकरी खरीप पिक विमा भरण्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे आपण भूमी अभिलेख कार्यालय , तहसिलदार , जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व विमा कंपन्यांना या संदर्भात आपल्या स्तरावरुन सुधारणा करण्याबाबत व कुठलाही शेतकरी खरीप पिक विमा भरण्यापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना आदेशित करावे. तसेच यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी. जिल्हाधिकारी सौ. दिपा मुधोळ-मुंडे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
 
Top