परंडा /प्रतिनिधी :-
परंडा तालुक्यातील अनाळा येथील एका दुकाना समोरील गर्दी हटवण्यास सांगीतल्याचा राग मनात धरुण पी.एस.आय सह पोलीसावर हल्ला केल्याप्रकरणी  दि.९ गुरुवार रोजी आनाळा येथील दुकानदारासह सहा जनाविरोधात आंबी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये एका आरोपीस पोलींसानी अटक केली आहे.
या बाबत आंबी पोलीसांनी सविस्तर दिलेली माहीती अशी की, आनाळा येथे मोतीलाल गादीया यांच्या मालकीचे गादीया जनरल स्टोअर्स व मोबाईल शॉपीचे दुकान आहे. सकाळी दहा च्या दरम्यान आंबी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.पालवे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी पोलीस गाडीमधुन सोनारी कडे निघाले होते.त्याच वेळेस अनाळा येथे आले असता चौकातील मोतीलाल गादीया यांच्या दुकानासमोर अस्ताव्यस्त गाड्याची पार्कींग व गर्दी दिसुन आली त्यानतंर स.पो.नि.पालवे यांनी गाडीतुन उतरूण सदरील दुकानदार कमलेश गादीया यास कोरोनाच्या अनुशंगाने गर्दी करू नका, सोशल डिस्टंन्स चे नियम पाळा रस्त्यावर पार्कींग करु नका अशा सुचना करत असताना सदरील दुकानदाराने माझ्या गाडया नाहीत.मला काय माहीती नाही असे म्हणत पालवे यांना उलट -सुलट बोलत खाली ढकलुन दिले यानंतर लगेच मोतीलाल गादीया, नितीन गादीया यांच्यासह तीन लोकांनी चिथावणी देत स.पो.नि. पालवे यांच्यासह इतर पोलींसांना शिवीगाळ करत मारहाण करूण जिवे मारण्याची धमकी दिली.याबाबत स.पो.नि.पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुण आंबी पोलीसांत दुकान मालक मोतीलाल देवीचंद गादीया, कमलेश मोतीलाल गादीया, नितीन मोतीलाल गादीया यांच्यासह तिघाजनाविरुद्ध कलम 353,323,341,343,109,427,504,506,143 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सहा आरोपी पैकी कमलेश मोतीलाल गादीया यास पोलीसांनी अटक केली असुन बाकी आरोपींच्या शोधात पोलीस आहेत या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधीकारी विशाल खांबे हे करत आहेत.

 
Top