उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने नोकरी इच्छुक उमेदवारासाठी एम्पलॉयमेंट नोंदणी कार्ड www.mahaswayam.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे.
  जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छूक उमेदवार, कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे उमेदवार तसेच या वेबपोर्टलवर नोंदणी केलेले सर्व उमेदवार ज्यांनी अद्याप पर्यंत आपले आधार कार्ड एम्पलॉमेंट कार्डशी लिंक केलेले नाही. त्यांनी वेबसाईटवर आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट करुन घ्यावेत.
संबंधित उमेदवारानी आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट (अद्यावत) न केल्यास आपली नोंदणी 15 ऑगस्ट 2020 अखेर रद्द होईल, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

 
Top